शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना सुरक्षा किटचे वाटप

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.19) शहर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

शहरातील व्हिआयपी रोडवरील कुसुम सभागृहात शुक्रवारी (दि.19) सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, काँग्रेस विधान परिषदेतील प्रतोद महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, जि.प. च्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. दिक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, जि.प.चे बांधकाम व शिक्षण सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती अ‍ॅड. रामराव नाईक, कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, स्थायी समिती माजी सभापती किशोर स्वामी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती प्रकाशकौर खालसा, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, कंधार-लोहाचे प्रभारी डॉ. श्याम तेलंग,प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकारी डॉ. रेखा चव्हाण आदींची उपस्थिती होती.

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मान्यवरांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचलन संतोष पांडागळे यांनी केले.यावेळी सीमेवर चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
.