नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात मृतांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसून मागच्या 24 तासांमध्ये 1 हजार 207 जण बाधित झाले आहेत, 26 जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गाने झाला आहे.तर दिडशे जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
नांदेड जिल्ह्यात 4 हजार 266 जणांची तपासणी करण्यात आली.यात 1 हजार 207 जण बाधित आले,यातील आरटीपीसीआर चाचणीत 465 तसेच अँटीजनमध्ये 742 जणांचा समावेश आहे.त्यामुळे जिह्यातील बाधित रुग्णांची संख्या 46 हजार 483 एवढी झाली.आजरोजी 1 हजार 13 रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत 34 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 10 हजार 725 एवढी असून यातील 153 जणांची प्रकृती अतिगभीर आहे.तर आज रोजी 26 जणांनी आपला जीव कोरोनाच्या संसर्गापुढे सोडला आहे. त्यामुळे एकूण मृतांची नोंद 869 पोहचली आहे.