वीस वर्षांच्या तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू;गंभीर रुग्णांची संख्या होतेय गंभीर

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात बघत-बघत कोरोनाच्या रुग्णंसंख्येने चार हजार रुग्णांचा टप्पा स्वातंत्र दिनाच्या मुहर्तावर साध्य केला आहे. या सगळया चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंतेचा भाग बनत चालली आहे. यात एका वीस वर्षांच्या तरुणीचा कोरेानाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्यात 1 हजार 769 जणांची चाचणी करण्यात आली. यात 1 हजार 565 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर 196 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात 148 अंटीजन तर आरटी-पीसीआर चाचणीत 48 जण पॉझिटीव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4 हजार 11 एवढी झाली आहे.तर शनिवारी 87 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत 2 हजार 312 जणांची कोरोनामुक्त म्हणून नोंद झाली आहे.

शुक्रवारी तिघांचा व शनिवारी एकाचा असे चार जण मागच्या चौविस तासांमध्ये मरण पावले असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. यात मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील 75 वर्षीय पुरुषाचा दि. 14 रोजी मृत्यू झाला. लोहा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा दि. 14 रोजी, सोमेश कॉलनी येथील 20 वर्षीय महिलेचा दि. 14 रोजी तर दीपनगर भागात राहणार्‍या 75 वर्षीय पुरुषाचा दि. 15 रोजी मृत्यू झाला.

सर्वाधिक कोरेानाचे रुग्ण हे नांदेड महापालिका हद्दीत 92, कंधार-26, धर्माबाद-22, उमरी-11 इतरत्र एकेरी संख्येत रुग्णांची नोंद आहे.आजघडिला 1 हजार 537 रुग्णांवर जिल्हयात उपचार सुरु आहेत. तर 181 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.