हिमायतनगर येथील तीन पैकी दोन ओमीक्रोन पॉझिटिव्ह

नांदेड

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यात 303 जण हे विदेशातून आले आहेत.यात दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर येथे आलेल्या तीन जणांचा समावेश होता.या तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून ओमीक्रोन बाबत चाचणी केली असता,यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या दोघांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. यातील त्या पुरुषाचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

दक्षिण अफ्रिकेतून हिमायतनगर येथे आलेल्या एक पुरुष, एक महिला व 6 वर्षे असलेल्या मुलीचा समावेश होता.तिघा जनांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर प्रशासनाने या तिघांचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू जन्य रोग संशोधन संस्थेकडे दि.22 रोजी पाठविले होते. सोमवार दि.27 रोजी यातील 30 वर्षीय महिला व 6 वर्षे मुलीचा समावेश असून दोघांचे अहवाल ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या विषाणू बाधित झाले आहेत.या दोघांची प्रकृती ठीक असून त्या पुरुषाचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे डॉ.भोसीकर यांनी सांगितले.


लस घ्या स्वतःला सुरक्षित करा:-डॉ.भोसीकर

कोरोनाच्या महामारील थांबवायचे असेल तर लसीकरण हा आपल्यापुढील पर्याय असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे,असे आवाहन डॉ.भोसीकर यांनी केले.