मनपा मालमत्तेसह खासगी मालमत्ता दुकानांचे कर माफ करा – प्रविण साले

नांदेड

नांदेड,बातमी24ः- कोरोना महामारी काळात संपूर्ण भारत देश टाळेबंद होता,त्यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात मनपा मालकी व खासगी मालकी असलेल्या व्यापार्‍यांना तीन महिन्यांच्या (एप्रिल,मे,जून) कर माफ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी दिले.

टाळेबंदीच्या काळात व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. अशा संकटाच्या काळात महापालिकेने मनपा मालमत्ता व खासगी मालमत्तता धारकांचे कर माफ करणे आवश्यक आहे. याबाबीचा महानगरपालिका प्रशासनाने सहानभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

मनपा व खासगी गाळेधारक मिळून शहरात हजारो व्यावसायिक आहेत,ज्यांचा उदरनिर्वाह छोट्या छोट्या व्यवसायांवर अवलंबून आहे.केस कर्तनालय,कटलरी, जनरल स्टोअर्स,रेडिमेड कापड,बेकरी,हॉटेल(खानावळ),पानटपरी,चहावाले मागील तीन महिन्यांपासून यांचा व्यवसाय बंद असल्याने ते दुकानांचे भाडे सुद्धा देऊ शकत नाहीत. तसेच मालमत्ता कर सुद्धा भरू शकत नाहीत.

केंद्र सरकार अनेक माध्यमातून नागरिकांना दिलासा देते आहे,तरी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने मागील तीन महिन्यांचे भाडे व मालमत्ता कर तसेच खासगी(दुकांनाचा)मालमत्ता कर माफ करण्यात यावा अशी मागणी मनपा आयुक्त यांना एका निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आल्याचे प्रवीण साले यांनी सांगितले.