नांदेड,बातमी24ः मागच्या सहा महिन्यांपासून सगळे धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम रद्द झालेले आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थी दिनी श्री स्थापना होत असते. त्या दिवशी शनिवार आहे. नांदेड जिल्ह्यात शनिवार व रविवार लॉकडाऊन पाळला जातो. त्यामुळे श्री स्थापने दिनी अर्थात शनिवारी लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागच्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहावा, यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन पूर्णवेळ पाळला जातो. विशेष म्हणजे, शनिवारी गणेश चतुर्थी असून त्या दिवशी गणपती स्थापना होत असते. हिंदु धर्मियांमध्ये गणपती उत्सवाचे अन्यसाधारण महत्व आहे. त्या दिवशी हिंदू धर्मियांकडून स्थापना होत असताना शनिवारी असलेल्या डॉकडाऊनमध्ये प्रशासनाकडून शिथिलता देण्यात येणार काय?याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.