जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेची कामे दर्जेदार:-सीईओ करणवाल स्पष्टोक्ती

नांदेड

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जळजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कामे ही नियमांच्या अधीन राहून करण्यात आले आहे. ज्या कामात कंत्राटदारांनी अनियमितता केली आहे,अशा कंत्राटदारांना व त्या अभियंत्यांला कधापीही पाठीशी घातले जाणार नाही. मी स्वतः अनेक भागातील कामे तपासली आहेत. कामाचा दर्जा नियमाला धरून कामे दर्जेदार होत असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात एकूण १ हजार २३४ इतक्या नळ पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सीईओ मीनल करणवाल यांनी रुजू झाल्यानंतर सदरील कामांचा वारंवार आढावा घेऊन सर्व यंत्रणांबरोबर समन्वय साधत कामांची गती व गुणवत्ता दोन्ही बाबतीत लक्ष घातले आहे. आजतागायत जिल्ह्यातील एकूण 231 इतक्या गावांमध्ये हर घर जल सर्टिफिकेशन पूर्ण झालेले आहे. या कामी सर्व गटविकास अधिकारी सर्व उपअभियतेस कंपनीचे श्री अकोलवार व जि प चे सर्व शाखा अभियंता कंपनीचे सर्व अभियंते हे रात्रंदिवस काम करून जलजीवन मिशनची कामे जलद गतीने पूर्ण करण्याकरिता प्रचंड मेहनत घेत असल्याचे सीईओ करणवाल यांनी सांगितले.

टाटा कन्सल्टन्सी या थर्ड पार्टी इन्स्पेक्शन टीमने वेळोवेळी कामांना भेटी देऊन कामे कटाक्षाने गुणवत्ता पूर्ण करून घेत आहेत. वेळप्रसंगी कंत्राटदारांची कटूता घेऊन त्रुटी असल्यास त्या तात्काळ दूर करूनच रिपोर्ट देत असल्यामुळे सर्व कामे चांगल्या दर्जाची होत असून वेगवेगळ्या यंत्रणा अभियंते कंपनी कामांना भेटी देऊन कामाचा दर्जा राखण्यावर भर देत आहेत. सदरची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यावर भर आहे. दि. 13 मुदखेड तालुक्यातील मौजे बारड मोजे तिरकसवाडी मोजे डोंगरगाव मोजे वैजापूर तसेच अर्धापूर तालुक्यातील बामणी येथील जलजीवन मिशन अंतर्गत प्रगती प्रथावर असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली असून या कामाबाबत समाधानी असल्याचे कळविले.