अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजात फु ट पाडू नये-अशोक चव्हाण

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजात श्रीमंत व गरिब असा भेद तयार करून या समाजात फु ट पाडू नये, असा सल्ला सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी दिला, ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षण व अशोक चव्हाण यांच्या घरासमोर छावा संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते गुरुवार दि. 17 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत बोलत होते. एका प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, की अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रीमंत व गरिब अशी मराठा समाजाची आरक्षणाच्या मुद्दावरून जी विभागणी केली, ती चुकीची आहे. सरसकट मराठा समाज हा एकमेकांच्या पाठीशी उभा आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, की अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे आमचे मित्र आहेत. परंतु ते मित्र जरी असले, तरी समाजात श्रीमंत व गरिब असा भेद होत नसतो.तसा प्रयत्न अ‍ॅड. आंबेडकर यांनी करू नये, असा सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला. या वेळी अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणांच्या संदर्भाने भूमिका मांडताना महाआघाडीचे सरकार सकारात्मक असून सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.