नांदेड,बातमी24:-देगलूर,बिलोली विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जितेश अंतापूरकर यांच्या नावाची घोषणा काँग्रेस पक्षानी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जितेश अंतापूरकर उद्या दि.7 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने पालकमंत्री अशोकराव चव्हाण व महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत एका जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना -आरपीआय (गवई गट)-पीआरपी- शेकाप व मित्रपक्षांचे उमेदवार जितेश अंतापूरकर निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देगलूर येथे उमेदवारी अर्ज उद्या दी.7 रोजी सकाळी 11 वाजता दाखल करणार आहेत. त्यानंतर देगलूर येथील उदगीर रोडवरील सिध्देश्वर पॅराडाईज मंगल कार्यालयात एका जाहीर सभेचे आयोजन केले आहे. मुळामध्ये महाविकास आघाडीची ही प्रचारसभा देगलूरच्या मोंढा मैदानावर होणार होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या उपस्थितांच्या संख्या मर्यादेमुळे ही सभा आता सिध्देश्वर पॅराडाईज मंगल कार्यालयात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रचारसभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार आहे. या सभेस माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे खा.खा.हेमंत पाटील, महाराष्ट्राचे सहप्रभारी संपतकुमार, शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खा.सुभाष वानखेडे, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.रामहरी रुपनवर, सुप्रसिध्द गायक व काँग्रेस नेते अनिरुध्द बनकर, आ.माधवराव जवळगावकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, आ.बालाजीराव कल्याणकर, आ.श्यामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आ.वसंतराव चव्हाण, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी आ.हणमंत पा.बेटमोगरेकर, माजी आ.रोहिदास चव्हाण, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादीचे नेते प्रा.यशपाल भिंगे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, आनंद बोंडारकर, दत्ता कोकाटे, पीआरपीचे महासचिव बापूराव गजभारे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती ॲड.रामराव नाईक आदींची उपस्थिती राहणार आहेत.
तरी या प्रचारसभेस महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.