अशोक चव्हाण यांचा साखर कारखाना… इतक्या किंमतीत विक्री; …उद्योजकाकडून खरेदी

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः– मागच्या दहा दिवसांपूर्वी उमरी तालुक्यातील वाघलवाडी येथील सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील साखर कारखाना विक्री करण्यात आल्यानंतर भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे युनिट-4 ची सुद्धा विक्री प्रक्रिया पूर्ण झाली.

अशोक चव्हाण यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून उस उत्पादक शेतकर्‍यांवर पकड तयार केली होती. मात्र मागच्या काही वर्षांमध्ये शेतकर्‍यांची वाढत जाणारी नाराजी, थकित रक्क्म, उसाच्या भावावरून होणारे राजकारण अशा बाबी साखर कारखानदारांना डोकेदुखी ठरणार्‍या ठरत. कदाचित त्यामुळे अशोक चव्हाण यांनी त्यांच्या ताब्यातील कारखाने विक्रीस काढले असावेत, असे बोलले जात आहे.

मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवडयात वाघलवाडी येथील कारखाना उद्योजक मारोतराव कवळे यांनी 51 कोटी रुपयांना खरेदी केला. या कारखान्याची विक्री केल्यानंतर हदगाव येथील हुतात्मा जयवंतराव सहकारी साखर कारखान्याची खरेदी अशोक चव्हाण यांनी 2012-13 या आर्थिक वर्षांमध्ये करून भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे युनिट चार उभारले. सदरचा कारखाना त्या वेळी 46 कोटी रुपयांना खरेदी केला होता. सात-आठ वर्षे चालविल्यानंतर कारखान्याचा विक्री लिलाव काढला.

या कारखान्यासाठी पाच जणांनी लिलावात सहभाग घेतला. मात्र सर्वाधिक 92 कोटी रुपयांची बोली लावून हदगाव तालुक्यातील सुभाष देशमुख व यशवंतराव देशमुख यांच्या भागीदारी असलेल्या उद्योग समुहाकडून खरेदी करण्यात आला. सुभाष देशमुख यांचा शिऊर येथे अडीख हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असलेला कारखाना गतवर्षी सुरु केला आहे.

पुढील काळात हदगाव तालुक्यात दोन कारखान्यांची मालकी असणारे कारखाना चालणार आहेत. सुभाष देशमुख यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे पाच हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असणारा कारखाना सुरु आहे.