विद्यापीठातील नियम बाह्य मंडळे बरखास्त करण्याची मागणी

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नियमबाह्यपणे स्थापन केलेले ग्रंथालय शास्त्र विषयांचे अभ्यास मंडळ बरखास्त करावे व नियम तोडणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी सिनेट सदस्य सुरज दामरे यांनी केली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध विषयांचे अभ्यास मंडळे तयार करण्यात आले आहेत नियम तोडून तयार केलेले हे अभ्यास मंडळ गेल्यावर तीन वर्षांपासून काम करत आहेत धक्कादायक बाब म्हणजे नियम तोडले गेल्याची तक्रार करणारांचे तोंड बंद करण्यासाठी तक्रार दाराला या मंडळाचे निमंत्रित सदस्य केले गेले.

जे शिक्षक पदवी स्थरावर शिकवण्याचे काम करतात त्यांना या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. विद्यापीठात बसून ही मंडळी पदव्युत्तर विषयाचा अभ्यास क्रम तयार करते, पेपर काढते व तपासते ही हा सर्व प्रकार निर्लज्जपनाचा कळस आहे असे दामरे यांनी म्हंटले आहे. विद्यापीठ कायद्यात हे मंडळ कसे स्थापन करावे याची नियमावली दिलेली आहे,त्याचे पूर्ण उल्लंघन विद्यापीठाने केले आहे असा आरोप दामरे यांनी केला आहे.