जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी असताना चार वर्षे प्रत्येक कामात आर्थिक मोबदला कमावण्याचे सर्वोच्च शिखर गाठणार्या सुनील खमीतकर यांना पुन्हा नांदेड येण्याचे डोहाळे लागले आहेत. विशेष म्हणजे खमीतकर हे लाचेच्या जाळयात नांदेड येथेच पकडले गेले होते.
दीर्घ काळ म्हणजे साडे तीन वर्षे जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यकाळ काढलेल्या सुनील खमीतकर यांनी करोडो रुपयांची संपत्ती जमा केली होती. स्वाक्षरी करण्यासाठी टक्केवारी कधी घेतली नाही,असे कधीच होत नव्हते. मोबदला न दिल्यास कामात अडकाठी आणली म्हणून सूमजाच , त्यामुळे जिल्ह्यातील शाळा संस्थाचालक, वस्तिगृहचालक, अपंग बांधवांसह समाजकल्याणसंबंधी प्रत्येक अभ्यांगत सुद्धा खमीतकर यांच्या हप्तेखोरीला कंटाळला होता.
पैसे खाताना सुद्धा ते अत्यंत सावधपणे यंत्रणा चालवित होते. एसीबीकडे तक्रारी करून ही ते सापळयात सापडत नव्हते. मात्र सरते शेवटी ते लाचखोरीत आडकले. लाचखोर अधिकारी लाचखोरीत अडकल्याने अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला होता.विदर्भात नौकरी करून ते आता लातूर जिल्हा परिषदेला समाजकल्याण अधिकारी म्हणून आले आहेत. लातूर येथे समाजकल्याण अधिकारी म्हणून खमीतकर यांना वर्षे सुद्धा झालेले नाही.लगेच नांदेडला येण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
यासाठी नांदेडमधील काही लोकांच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत. मात्र अशा उपद्रवी अधिकार्यास पालकमंत्री अशोक चव्हाण हे पुन्हा स्थान देतील, ही शक्यता धुसरच आहे. कदाचित ते आले तरी येथील जनता त्यांचे कपडे फ ाडल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती म्हणा किंवा चीड खमीतकर यांच्याबाबतीत नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेली आहे.