नांदेड,बातमी24:- मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आजचा नसून पंचवीस वर्षे जुना आहे. उपसमितीचे अध्यक्ष असलेले अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सुद्धा आरक्षण देऊ शकले नाहीत, आता काय अपेक्षा धरावी,त्यांचा पायगुण चांगला नाही,अशी टीका अखिल। भारतीय छावा मराठा। युवा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली,ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने सोमवार दि.14 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली,यावेळी ते बोलत होते, नानासाहेब जावळे म्हणाले,की मराठा समाजाला आरक्षण देण्याची चांगली संधी आली होती,परंतु राज्यकर्त्यानी संधी हाणून पाडली.मागच्या सरकारप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संधी घालवली आहे.आता ही या राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक मराठा आरक्षणासाठी एकत्र आले, तर अशक्य नाही,असे जावळे यांनी सांगितले.
आरक्षणास स्थगिती दिली,असली तरी सरकारने अध्यादेश काढला तर आरक्षण टिकू शकते.मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता, सरकारने तातडीने प्रश्न सुटू शकतो,याची जाणीव ठेवावी, अन्यथा समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा नानासाहेब जावळे यांनी दिला.