महिलांच्या सुरक्षेच्या विषयावरून भाजपचे ‘आक्रोश’ आंदोलन

महाराष्ट्र

 

नांदेड,बातमी24:-
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न
गंभीर होत चालल्याचा मुद्दावरून भाजपा महिला मोर्चाच्या
वतीने आज दि. 12 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले पुतळा येथे ‘आक्रोश’
आंदोलन करण्यात आले.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. कोरोना
महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पीटलमध्ये
महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरुच आहे.

महाविकास आघाडी सरकार मात्र
महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्क्रीयता दाखवत असून महिलांच्या सुरक्षेसंदर्भात असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारच्या विरोधात शहरातील महात्मा फुले
पुतळयासमोर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात येणार
आले.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात , डॉ. शितल भालके, नगरसेविका बेबीताई गुपिले, श्रद्धा चव्हाण, शततारका पांढरे,महादेवी मठपती, सुष्मां ठाकूर, सुरेखा जोशी, अनुराधा गिराम, अश्विनी जाधव, दिलीप कंदकुरते आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.