नांदेड शहरातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

महाराष्ट्र

 

नांदेड, बातमी24:- नांदेड शहरातील काही भागात रविवार दि.25 राजी सकाळी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तसेच जमिनीमधून गूढ आवाज येत असल्याचे त्या भागातील नागरिकांनी सांगितले.

नांदेड शहरातील श्रीनगर भागात पूर्वीपासून जमिनीमधून गूढ आवाज येणे,सौम्य धक्के जाणवणे असे प्रकार अधून-मधून घडत असतात. त्याचप्रमाणे रविवारी सुद्धा सकाळी अकरा वाजून 8 मिनिटाला 0.6 रिष्टर स्केल व 11 वाजून 32 मिनिटाला सुद्धा 0.8 रिष्टर स्केलचा धक्का जाणवला.या दोन्ही धक्याची नोंद सिसमोग्राफवर नोंदविली गेली आहे.