राज ठाकरे यांनी केले इरावार कुटुंबियांचे फ ोन करून सांत्वन

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24; राजकारणात जात व पैसा महत्वाचा असतो. ते दोन्ही माझ्याकडे नाही, असे राजसाहेब मला माफ करा, अशी चिट्टी लिहून रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी मनसेचे किनवट शहर प्रमुख सुनील इरावार यांनी आत्महत्या केली होती. कार्यकर्त्याच्या आत्महत्येची दखल घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मयत इरावार यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत धीर देत सांत्वन केले.

सुनील इरावार यांनी किनवट येथील राहत्या घरी गळफ ास लावून आत्महत्या केल्याची घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आत्महत्या करण्यांपूर्वी त्यांनी अखेरचा जयमहाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे, राजसाहेब मला माफ करा, अशी चिट्टी लिहली होती. पक्षाचा किनवट शहर प्रमुख गेल्याची दुख व्यक्त करत राज ठाकरे यांनी सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी मयत सुनील यांचे बंधुशी संवाद साधला. हे करण्यापूर्वी त्याने मला बोलायला हव होत. अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

या वेळी ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची माहिती जाणून घेतली. या दुखातून सावरण्याची हिंमत त्यांच्या कुटुंबियांना दिली. मी आपल्या कुटुंबियांची भेट घेऊन जाईल, काळजी करू नका असा धीर राज ठाकरे यांनी दिला. मयत सुनील इरावार हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक व निष्ठावंत म्हणून किनवट तालुक्यात परिचित होते. त्यामुळे वयाच्या 27 वर्षी राज ठाकरे यांनी मयत इरावार यांच्यावर किनवट शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती.