राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

महाराष्ट्र

 

नांदेड,बातमी24:- लिंगायत समाजाचे धर्मगुरू तथा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी मंगळवार दि.1 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते.

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार अशी अफवा उठली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी अन्नत्याग केला होता. त्यानंतर महाराज यांना चार ते पाच दिवसांपूर्वी नांदेड येथील नारायणा रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. महाराज यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1917 रोजी झाला होता. फाळणीपूर्वी भारताचा भाग असलेल्या लाहोर विधापीठातून त्यांचे वैधकीय अभ्यासक्रम पूर्ण केला होता.त्यानंतर 1932 साली विरमठ संस्थांचे ते उत्तराधिकारी होते.धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.लिंगायत समाजाचे ते दैवत होते. त्यांचे पार्थिव नांदेड येथून अहमदपूरकडे प्रयाण करण्यात आले.