एसआरटी विद्यापीठ तक्रार करणाऱ्या सिनेट सदस्य दामरे सह नऊ जणांना 2लक्ष दंड

महाराष्ट्र

नांदेड,बातमी24:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुरज दामरे यांना परीक्षेतील गैर कारभाराबद्दल सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाने तीन वर्षासाठी अपात्र ठरविले असून 25 हजार रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे.

पुणे जिल्ह्यातील न्हरे येथील झिल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च येथील स्नेहल जगताप या विद्यार्थिनीच्या एम ई परीक्षेत 2017 मध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यावर कुलगुरूनी त्याच्या चौकशी करिता महेश काकडे यांची समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल आल्यावर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होऊन डॉ महेश आबाळे यांची समिती गठीत करण्यात आली
डॉ आबाळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वास्तुनिष्ठ अहवाल दिला त्या नुसार पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार या महाविद्यालयांच्या सात जनाविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली असून एकूण दोन लक्ष पंचांहात्तर हजर रु दंड आकारण्यात आला आहे.

या महाविद्यालयाचे प्राचार्य असित काटे, वरिष्ठ पर्यवेक्षक नरेंद्र काटे, आलदार भारत, प्रशांत माने यांना प्रत्येकी 50 हजार रु दंड व परीक्षेच्या कामातून पाच वर्षासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
कनिष्ठ पर्यंवेक्षक विश्वजित जाधव, बालाजी चौगुले, व दामरे सुरज शंकरराव यांना प्रत्येकी 25 हजार रु दंड व तीन वर्षासाठी परीक्षेच्या कामातून अपात्र ठरविण्यात आले आहे. या पैकी दामरे सुरज हे नांदेड विद्यापीठात राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य आहेत. सिनेट सदस्य म्हणून ते नांदेड विद्यापीठाच्या विविध कामाच्या सतत तक्रारी करत असतात त्यांच्या या वर्तणामुळे राज्यपाल कार्यालयाने त्यांना समज दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.पुणे विद्यापीठाच्या या कारवाईने त्यांच्या तक्रारी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असल्याची प्रतिक्रिया ऐकावंयास मिळत आहेत.
झिल संस्थेने या सर्वांवर कारवाई करावंयाची असून दंडाची एकत्रित रक्कम 2लक्ष पंचांहात्तर हजार रु. पुणे विद्यापीठात भरावयाचे आहेत. तसे न केल्यास परीक्षा घेतल्या जाणार नाहीत असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे.