जिल्हा महिला कॉंग्रेसची पदयात्रा ; शासनाला दिले निवेदन

राजकारण

नांदेड,बातमी24:-केद्रं सरकारचा महागाई,बेरोजगारी व कृषि कायद्या या केन्द्र सरकारकारच्या धोरणाविरोधात पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत नियमांचे पालन करीत व सामाजिक अंतर ठेवत पदयात्रा काढुन हल्लाबोल करण्यात आला.
नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या महागाई बेरोजगारी व कृषी कायद्याच्या विरोधात नवामोढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पदयात्रा काढून निषेध करण्यात आला.यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता कळसकर,महिला काँग्रेस प्रदेश पदाधिकारी मंगलाताई निमकर , डॉ. रेखाताई पाटील. अनिता हिंगोले,मंगलाताई धुळेकर , सुमती व्याहाळकर . प्रा.ललिता शिंदे,छाया कळसकर,समदानी, देवशेटवार , जयश्री जयस्वाल, जयश्री राठोड यांच्यासह महिला पदाधिकारी सहभागी झाले होते. या पदयात्रेत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवत काढण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.