जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः जिल्ह्याच्या राजकारणात मोदी लाटेत कधी नव्हे ते चांगले दिवस पक्षाला आले. दरम्यानच्या काळात पक्षाने जिल्ह्यात चांगले बारसे धरले असताना तितकेच गट-तट ही उभे टाकले आहेत. काँग्रेसला आव्हान निर्माण करू शकलेला भाजप पक्ष जिल्ह्यात गटा-तटात विखुरला जात आहे. हे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकुर्ते यांनी वाढदिवसानिमित्त दाखवून दिले आहे. कंदकुर्ते यांनी वाढदिवसाच्या जाहिरातीवर जिल्ह्यातील पक्षाचे खासदार,आमदार किंवा अन्य नेत्यांची फ ोटो टाकणे जाणीवपूर्वक टाळले. कंदकुर्ते यांनी पक्षांतर्गत जिल्ह्यातील नेत्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने एकाप्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
एक वेळ भाजपच्या व यंदाची निवडणूक अपक्ष लढणारे व नुकतीच भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून वर्णी लागलेले दिलीप कंदकुर्ते यांचा वाढदिवस गुरुवारी झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने एका स्थानिक दैनिकात पानभर जाहिरात प्रकाशित केली. मात्र या जाहिरातीवर जिल्ह्यातील एकाही नेत्याचा फ ोटो टाळणे दिलीप कंदकुर्ते यांनी जाणीव टाकले आहे. या जाहिरातीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
सन 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप कंदकुर्ते यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी त्यांचा निसटता पराभव झाला. सन 2019 च्या निवडणुकीत ही दिलीप कंदकुर्ते हे दुसर्यास्थानी राहिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षातील नेत्यांनी मदत केली नसल्याची नाराजी दिलीप कंदकुर्ते यांची आहे. विधानसभा निवडणुकीत जे काही मते मिळाली,ही माझे एकगठ्ठा मते आहेत. यात पक्ष व जिल्ह्यातील नेत्यांचे योगदान नसल्याचे दिलीप कंदकुर्ते यांचे खासगीत म्हणणे असते.
कदाचित हाच राग त्यांच्या मनावर असावा, त्यामुळे अगदी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यापासून भास्कराव पाटील खतगावकर यांना फ ोटोत स्थान दिले गेले नाही.त्यामुळे पक्षाचे आमदार व निष्ठावंत असो किंवा जबाबदार पदावरील नेत्यांचा फ ारसे गुमाणण्याचा प्रश्नच येत नसावा, असे त्यांचे मत असावे, त्यामुळे दिलीप कंदकुर्ते यांनी भाजपच्या देश व प्रदेश पातळीवर फ ऊी नांदेड जिल्ह्यातील नेत्यांना वगळून राज्य पातळीवरील बडया नेत्यांना फ ोटोवर स्थान दिले आहे.