नांदेड,बातमी24ः-मराठा आरक्षणासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करणार्या े खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी या विषयावर खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी दिले.दोन दिवसांपूर्वी चिखलीकर यांनी मराठा आरक्षणांवरून अशोक चव्हाण यांच्यावर निशाना साधला होता.
गुरुवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदे आयोजित करून मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाण यांना टार्गेट केले हेाते. अशोक चव्हाण यांना समितीमधून वगळले असते. तर ही वेळ आली नसती, अशी टीका करत मराठा आरक्षणावरून चव्हाण यांना चिखलीकर यांनी दोषी ठरविले होते.
चिखलीकर यांनी केलेली टीका काँग्रेसच्या जबरी लागली आहे. या प्रकरणी माजीमंत्री डी.पी. सावंत यांनी प्रसिद्धीपत्रक काढत, ते म्हणाले, की नांदेडच्या खासदारांना व्यक्तीद्वेषाने पछाडले आहे. त्यामुळेच ते सतत पालकमंत्र्यांवर निराधार व असत्य आरोप करीत असतात. परंतु, मराठा आरक्षणासारख्या कोणत्याही सामाजिक मुद्याचा राजकारणासाठी वापर करणे अतिशय चुकीच असल्याचे सावंत यांनी नमूद केले.
मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी गंभीरतेने सांभाळली. त्या माध्यमातून त्यांनी एक समन्वयाचे वातावरण निर्माण केले. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना दिलेला अंतरिम आदेश न्यायसंगत नाही, असे मत अनेक विधीज्ञांनी जाहीरपणे मांडले आहे.
सत्ता गमावल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सत्तातूर नेत्यांनी बिनबुडाचे आरोप करण्याचे सत्र सुरू केले आहे. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर पुरेसा अभ्यास असेल तर त्यांनी केवळ प्रसिद्धी पत्रक काढून थांबू नये. तर या विषयावर त्यांनी खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान आम्ही देत आहोत. हिंमत असेल तर खासदारांनी हे आव्हान स्वीकारावे, असे डी.पी. सावंत यांनी म्हटले आहे.