मंत्री चव्हाण यांच्या संस्थेतील विद्यार्थींनीची तीन मंत्र्यांकडून दखल

राजकारण

नांदेड, बातमी24ः-पाचशे पैकी पाचशे गुण मिळविणार्‍या नांदेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थींनीची दखल राज्याच्या तीन मंत्र्यांनी घेतली. यामध्ये उर्जामंत्री नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांनी स्नेहल कांबळे हिचे कौतुक व अभिनंदन करणारे व्टिट केले. मात्र या संस्थेतील पदाधिकार्‍यांना मात्र इतर मंत्र्यांनी अभिनंदन केल्यानंतर जागा आला.तर या संदर्भात संस्थेकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाच माहिती दिली गेलेली नसावी, कदाचित त्यामुळे चव्हाण यांच्याकडून कौतुक राहून गेले.

दहावी बोर्डाचा निकाल दोन दिवसांपूर्वी आहे. या परीक्षेता शारदा एज्युकेशन संस्थे अंतर्गत असलेल्या बाबा नगर भागातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी असलेल्या स्नेहल मारोती कांबळे हिने पाचशे पैकी पाचशे गुण मिळवित पहिला येण्याचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल स्नेहल हिचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत असताना या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना याची साधी भनक सुद्धा नव्हती.

या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शुक्रवारी सकाळी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी तिचे अभिनंदन केले. या संदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना संस्थेकडून माहिती दिली गेली नसावी, अन्यथा अशोक चव्हाण यांच्याकडून तात्काळ दखल घेतली गेली असती. जिल्ह्यातील लोकांच्या सुखाःदुखाची अशोक चव्हाण हे जाणीव ठेवणारे नेते आहे. कदाचित पक्षातील व त्यांच्या संस्थेतील लोकांकडून त्या मुलीच्या कौतुकाचे महत्व वाटले नसावे, असे ही होऊ शकते. कदाचित त्यामुळे त्या मुलीचे कौतुक करणे अशोक चव्हाण यांच्याकडून राहून गेले असावे.