नांदेड, बातमी24ः भाजपचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे काय करतील,कसे वागतील, कसे बोलतील याचा नेम मतदारसंघातील लोकांना लागत नसताना स्वतःच्या संस्थेतील कर्मचार्यांना तर ते कचर्यासमान वागणूक देत असल्याने कर्मचारी विरोधात गेले आहेत. संस्थेवर प्रशासन नेमण्याची मागणी कर्मचार्यांनी केली आहे. एकाप्रकारे राजेश पवार यांना हा घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील राजकारणातील उमद नेतृत्व, अभ्यासू राजकारणी व काम करण्याची धडपड ज्या नेत्यांमध्ये नायगाव मतदारसंघातील लोकांनी बघितली. ते राजेश पवार होय. त्यामुळे सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदारांन भरघोस मतांनी विजयी केले. मात्र विजयाच्या काही दिवसांमध्ये आमदारकीच्या तोर्यात वागायला लागले. यातून त्यांना कधी सत्यवादी होत असल्याचा साक्षात्कार होतो. कधी राशन दुकानदार हे गुंड असल्याचा भास होतो. अचानक झोपेत भयानक स्वप्न पडावे, जे, की आपणास कुणी तरी मारणार याची भिती जागी होते.
काही दिवसांपूर्वी एका वादग्रस्त क्लिपमुळे वादाच्या भोवर्यात सापडलेले राजेश पवार यांचे प्रकरण ताजे असताना राजेश पवार यांच्या विरोधात उमरी येथील संत दासगणू महाराज माध्यमिक आश्रम शाळेतील संपूर्ण कर्मचारी वर्ग विरोधात गेला आहे. त्यामुळे प्रशासन नेमण्याची मागणी सहाय्यक आयुक्त समाजकल्या यांच्याकडे नुकतीच केली आहे. या संस्थेवर जिल्हा परिषद सदस्य सौ. पुनम पवार या अध्यक्ष, सचिव म्हणून आमदार राजेश पवार हे आहत. तर मुख्याध्यापक डी. डी. शिंदे हे आहेत.
समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले, की मागच्या चार वर्षांपासून संस्थेचे शाळेवर लक्ष नाही. शाळेवर होणारा अर्धा खर्च कर्मचार्यांनी करावा,अन्यथा शाळ बंद करतो, अशी धमकी वारंवार दिली जाते.शाळेवर येऊन अभिलेखे उचलून घेऊन जाणे, सेवेवर असणार्या कर्मचार्यांना मद्यप्राशन केल्याचा आरोप लावून वैद्यकीय तपासणी करा, अन्यथा पोलिसांना बोलावून गुन्हे नोंद करतो, दबाव टाकून कर्मचार्यांकडून लिहून घेणे,अशा प्रकारामुळे आम्ही कर्मचारी व आमचे कुटुंब भितीच्या सावटाखाली वावर आहोत.त्यामुळे या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावी, यांबंधीची मागणी खूद मुख्याध्यापक डी. डी. शिंदे यांनी केली.