जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभवास वंचित बहुजन आघाडीने घेतलेली निर्णायक मते कारणीभूत ठरली आहे. दीड लाखांपेक्षा अधिक मते घेणारे वंचितचे उमदेवार प्रा. यशपाल भिंगे गेले कुठे असा प्रश्न ू पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्यांना पडू लागला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआएम ला सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक लढविली. निवडणुकीच्या चार ते पाच महिने अगोदर वंचित बहुजन आघाडीने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली होती. ते होते नांदेड येथील प्रा. यशपाल भिंगे होय.धनगर समाजातील अधिक प्रतिनिधीत्व देण्याच्या उद्देशाने प्रा.यशपाल भिंगे यांच्या उमेदवारीला महत्व आले होते.प्रचारास सर्वाधिक वेळ मिळालेले एकमेव ते उमेदवार होते. राज्यभरात वंचितची मोठी लाट आली होती. त्या वेळी मुस्लीम मतांची साथ लाभली असती. तर कदाचित त्या वेळी प्रा. यशपाल भिंगे हे विजयी होऊ शकले असते. परंतु मुस्लिम व धनगर समाजाची मते त्यांना मिळू शकली नाही.
लोकसभेची निवडणूक ही प्रामुख्याने अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर व प्रा. यशपाल भिंगे या तिनच उमेदवारांमध्ये झाली. भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना 4 लाख 86 हजार मते मिळाली, अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार तर प्रा. यशपाल भिंगे यांना 1 लाख 66 हजार एवढी मते मिळाली. चिखलीकर यांना 43 टक्के, चव्हाण यांना 38 टक्के तर प्रा.भिंगे यांनी 14 टक्के मतदान घेतले. तिसर्या उमेदवाराने 1 लाख 66 हजार मते घेतल्यामुळे अशोक चव्हाण यांचा 44 हजार मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे सन 2014 च्या मोदी लाटेत अशोक चव्हाण हे डी.बी.पाटील यांच्या विरोधात मोठया फ रकाने विजयी झाले होते.
सन 2019 साली मोदी लाट अशी परिस्थिती नसताना वंचित बहुजन आघाडीमुळे अशोक चव्हाण हे पराभूत झाले. त्यांच्या पराभवास वंचितचे ते उमेवार राहिलेले प्रा. यशपाल भिंगे जाँईठ किल्लर ठरले. मात्र वंचितच्या पक्ष कार्यात प्रा. भिंगे हे कुठेही दिसत नाही. पक्षाकडून आंदोलन होत असताना ते सक्रिय नसतात. वंचितमुळे राज्यभर प्रकाश झोतात येण्याची संधी प्रा. भिंगे यांना मिळाली होती. मात्र ते मधल्या काळापासून राजकारण व समाजकारणापासून अलिप्त झाले आहेत. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्ते व वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रा. भिंग सर आहेत, तरी कुठे असा प्रश्न पडू लागला आहे. तसा प्रश्न पडणे हे सुद्धा सहाजिकच म्हणावा लागेल.