बिलोली, बातमी24ः- कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे स्वॅब घेतलेल्या संशयिताने स्वत:विलेगीकीकरण करून घेणे आवश्यक असते. परंतु त्या बाधित पत्रकाराने सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावून नियमांचा भंग केल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरेाना पॉझिटीव्ह आलेल्या एकमेव पत्रकारावर आपत्ती अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बिलोली शहरात वाटप करण्यात आलेल्या मास्क,सनिटायजर व आयुर्वेदिक काढ्याच्या वाटप कार्यक्रमाला बिलोली शहरातील कोरोना बाधीत एका पत्रकाराने उपस्थिती लावली होती. स्वतःचा कोरोना चाचणीचा स्वब देवून सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणे त्या पत्रकारास चांगलेच भवले आहे. त्यामुळे त्या पत्रकाराविरुत्र बिलोली पोलीस ठाण्यात कलम 188,269,271 भादवी व सहकलम 51-बी नुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
——-
सदरील पत्रकाराच्या संपर्कात आलेले बहुतांश पत्रकारांना सहा दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सहा दिवसानंतर त्यांची कोरोना चाचणी
घेतली जाणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डा.नागेश लखमावार यांनी दिली आहे.