नांदेड, बातमी24ः चार महिन्यांपासून नांदेड जिल्हा परिषदेला सीईओ मिळत नसल्याने प्रभारी काळात अनागोदीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. हदगावच्या गटविकास अधिकार्याचा अतिरिक्त पदभार असलेल्या एका ए बिडिओकडेच माहूर गट विकास अधिकार्याचा पुन्हा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. विशेष म्हणजे, माहुर येथील एक बिडिओ असताना त्यास डावलण्यात आले आहे. डॉ. शरद कुलकर्णी यांनी वरातीमागून घोडे नाचविण्याच्या प्रकार असल्याचा आरोप जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष समाधान जाधव केला आहे.
जिल्हा परिषदमध्ये पैसे द्या न होणारी कामे सुद्धा करून घेऊन जा, इतकीच उघडपणे पाटी लावण्याचे बाकी आहे. प्रशासकीय कारभार रसातळाला गेला, असून यावर पदाधिकारी व अधिकार्यांची भागीदारी सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी मिलीभगत सुरु आहे. कोण्या पदाधिकारी व मर्जीतील अधिकार्याने सांगितले, की प्रभारी सीईओेंकडून काम थांबले असे कधीच होत नाही.
यातील ताजा प्रकार म्हणजे माहुर येथील गटविकास अधिकारी हे रजेवर गेले असताना त्या जागी तेथील ए बिडिओकडे पदभार येणे संयुक्तीक ठरते. परंतु तसे न करता डॉ. शरद कुलकर्णी यांनी हदगाव येथील प्रभारीच देशमुख नामक अधिकार्याचे आदेश काढले आहेत. हदगाववरून देशमुख नामक प्रभारी बिडिओ देशमुख यांनी कधी जाऊन कारभार हाकावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. तेथील ए बिडिओकडे प्रभारी पदभार दिला असता, तर अधिक अडचणी आल्या असत्या असे समाधान जाधव यांचे म्हणणे आहे.
——
चार महिन्यांच्या काळात प्रभारी सीईओ डॉ.शरद कुलकर्णी यांनी तुघलकी कारभार चालविला आहे. अनियमिततेचे कुरण जिल्हा परिषदेला करून टाकले आहे. चुकीचे आदेशा काढल्यावरून डॉ. कुलकर्णी यांना जाब विचारले जाणार आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी सुधीर ठोेंबरे यांनी सुद्धा सदस्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली असल्याचे समाधान जाधव यांनी सांगितले.