नांदेड शहरावर ड्रोन कॅमेर्‍याची नजर

नांदेड

नांदेड, बातमी24ः– संचारबंदीचे पालन काटेकोरपपणे व्हायला पाहिजे, या दृष्टीने प्रशासनाने हलचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड शहरावरील संचारबंदीसाठी ड्रोन कॅमेरे सुद्धा नजर ठेवून आहेत.

कोरोनाच्या वाढत जात असलेल्या संख्येवरून जनतेमधून जिल्हाधिकारी, महापालिक आयुक्तांवर रोष व्यक्त केला जात होता. जनतेतून संचारबंदी लावण्याची मागणी यातूनच जोर धरू लागली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यापूर्वी 12 जुलैपासून लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 12 जुलै सोमवारपासून झाली आहे.

संचारबंदीच्या आदेशात कुठेही मोकळी राहता कामा नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर हे रस्त्यावर उतरले असून विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांना सूचनावजा इशारा देत आहे. याचसोबत शहरातील महत्वाच्या ठिकाणावर ड्रोन कॅमेरे सुद्धा घिरटे घालत आहेत.रस्त्यावर पोलिसांची न हवेत ड्रोन कॅमेर्‍यांची नजर असल्याने संचारबंदीच्या काळात अनावश्यक रित्या बाहेर पडणे नागरिकांना महागात पडणारे असल्याचे एकंदरीत बंदोबस्तावरून दिसून येते.