नांदेड,बातमी24:- पिंपरी-चिंचवड येथील विराज जगताप खुन प्रकरण गाजत असून सदर प्रकरणात दोषी असणारे आरोपीना शासन व्हावे यासाठी समाजातील कोणीही कसल्याही प्रकाराचा विरोध केला नाही.सदर प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया चालु असताना काही समाज कंटक या घटनेच्या आधारे मराठा-दलित समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहेत.
या प्रकरणाला जातीय रंग देवून अत्यंत भडक अशा प्रकारची धमकी व चेतावणी खोर पोर-ट सोशलमिडियावर वायरल केली जात आहे.या
समाजकंटकामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आलेले आहे.यातुन राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.समाजातील अशा जातीय वाद पसरविणा-या आणि समाजातील महिलांच्या बाबत आक्षेपार्य टिपणी करणा-यावर कडक कार्यवाही करण्यात यावी.
या बाबत राज्यातील सामाजिक व कायदेशीर व्यवर-था आबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकाराला आळा बसावा या करीता कडक शासन करण्याची मागणी
मराठा समाजातील पाच मुलीनी निवासी जिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी सुचिता जोगदंड यांच्यासह निता देशमुख,रोहिणी टाकळीकर,रूतुजा पवार,श्रेया भोसले उपरि-थत होत्या.