रुग्णवाहिका सेवेचे नवे दर जाहीर

नांदेड

नांदेड, बातमी24ः- आजारी रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरणार्‍या रुग्णवाहिकेचे दर निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित करण्यात आलेल्या दराप्रमाणे आकारणी करावी लागणार आहे. त्यापेक्षा अधिक दर आकारल्यास रुग्णवाहिकेवर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णवाहिकेच्या सुधारीत भाडेदर निश्चिती करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे 9 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये रुग्णवाहिकांचे सुधारीत भाडेदराबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार रुग्णवाहिकेचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
——-
गाडीचे भाडेदर पुढील प्रमाणे
गाडी प्रकार—25 किमी—-दोन तास—-कि.मी

1)मारुती व्हॅन—500——500—–12 रु.

2) मॅटडोर व्हॅन–550——550——14 रु.

3)टाटा 408—650——650——14 रु.

4)आयएसयू/एसी व्हॅन-1000–1000–25 रु.

अशी आकारणी असणार असल्याचे कामत यांनी सांगितले.