मराठवाडयाचे भूमिपुत्र बनले युरोपातील राजदूत

देश

लातूर, बातमी24ः- मराठवाडयाच्या मातीने अनेकांनी देश व विदेश पातळीवर पातळीवर झेंडा फ डकविला आहे. राजकारण्यांसह प्रशासकीय अधिकार्‍यांची मोठी परंपरा या भूमीतील हिर्‍यांनी मिळवून दिली आहे. लातूर येथील भूमिपुत्र असलेल्या हेमंत कोटलवार यान सनदी अधिकार्‍याची नुकतीच युरोपातील झेकोस्लोव्हाकिया येथे भारताचे राजदूत नियुक्ती झाली आहे. युरोपात मराठवाडयातील अधिकारी राजदूत बनण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.

हेमंत कोलटवार हे मुळचे लातूर जिल्हयातील असून ते 1996 च्या बॅचचचे आयएफ एस अधिकारी आहेत. कोलटलवार यांनी विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. कोटलवार यांनी जागतिक व्यापार संघटन,आंतररातीय व्यापारात भारतास अनकुलता मिळवून देणे, सौदी अरेबिया व येमेनेच्या युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करणे, तसेच लदाख, गलवान व डोकलाम प्रकरणात सुरक्षा परिषदेचे सहसचिव म्हणून शांतपणे हाताळलेले प्रकरण व मिळविलेली यशस्वीता महत्वाच्या मानल्या जातात.