जिल्हा मध्यवर्ती बँक ठरली उद्दिष्टात अव्वल

कृषी

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या महामारीत सामान्य माणसासह शेतकरी सुद्धा पेचला गेला आहे. अशा संकटाच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पाडून एकूण उद्दिष्टांच्या 140 टक्के कर्ज वाटप केले आहे,अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी दिली.

शेतकर्‍यांची कामधेनू म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघितले जात असते. परंतु दहा ते पंधरा वर्षी तत्कालीन संचालक मंडळाने या बँकेला आर्थिक लुटीचा अड्डा बनविला होता. यातून बँकेची पत रसातळा गेली होती. नाईलाजास्तव प्रशासन सरकारला नेमावे लागले होते. या प्रशासक काळात कठोर निर्णय घेतले गेले. त्यामुळे बँक पुर्वपदावर आली. शेतकर्‍यांचा उडलेला विश्वास पुन्हा निर्माण करण्यास अनेक वर्षे परिश्रम घ्यावे लागले. बँकेच्या पुनर्रजीवन करण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांचा मोठा वाटा राहिला आहे.

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 185 कोटी 74 लाख 78 हजार देण्यात आले होते. यामध्ये 55 हजार 125 सभासदांसाठी वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार 258 कोटी 26 लाख 18 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आले. यात अल्पभुधारक शेतकर्‍यांची संख्या 42 हजार 597 इतकी आहे. तर या शेतकर्‍यांची पीक कर्जाची रक्कम 191 कोटी 94 लाख इतकी होेते. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी दिली.