संचिका निर्जतुकीकरणाचा डॉ. ठोंबरे पॅटर्न

नांदेड

 

नांदेड, बातमी24ः- विविध विभागाकडून फि रणार्‍या संचिका हाताळताना कोरोनाचा धोका उद्भवू नये, यासाठी येणारी प्रत्येक संचिकेस निर्जतुकीकरण करून टेबलवर ठेवायची आणि त्यांनतर आपल्याकडून पुढे जाताना त्या संचिकेचे निर्जतुकीकरण करूनच पाठविण्याचा एका चांगला पायंडा एका अधिकार्‍याने पाडला आहे.

जिल्हा परिषदचे सामान्य प्रशासन विभागचे उपमुख्य कार्यकारी सुधीर ठोंबरे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. मात्र वैद्यकीय सेवा नाकारून ते एमपीएससीच्या माध्यमातून वर्ग एक चे अधिकारी झाले. काही दिवस कळमनुरी गट विकास अधिकारी व त्यानंतर नांदेड येथे बदलीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वी रुजू झाले.

जिल्हा परिषदमधील फि रणार्‍या संचिकेवर किती जणांचे हात लागू शकतात. हे सांगणे अशक्य असते. याबाबत कुणाकडून धोका पोहचू नये,यासाठी डॉ. सुधीर ठोंबरे हे येणार्‍या प्रत्येक संचिकेवर कर्मचार्‍यास स्प्रेव्दारे सॅनिटायझर करून घेतात. मगच ती संचिका हाताळत असतात. त्यांच्याकडून पुढे जाणार्‍या संचिकेवर सुद्धा ते सॅनिटायझर करून पाठवित असतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा संभाव्या धोका कमी होतो, असे डॉ. ठोंबरे यांनी सांगितले

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. अधिकार्‍यांना सेवेवर जाणे अनिवार्य आहे.संचिका सुद्धा निकाली काढाव्या लागतात. या सगळया संभाव्य धोक्याचा विचारात घेता संचिका सॅनिटायझर करण्याचा डॉ. ठोंबरे पॅटर्न प्रत्येक अधिकार्‍यांनी अंमलात आणणे काळजीवाहू असणार आहे.