विष्णु नगर येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24ः शहरातील विष्णु नगर भागातील एका 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार दि. 18 रोजी पहाटे घडली.

कोरोनाच्या वाढत्या संख्येसह मृत्यूचा आकडा ही वाढत आहे. कालपर्यंत कोरोना मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 43 इतकी होती. विष्णु नगर भागात राहणार्‍या एका 65 वर्षीय सेवानिवृत्त असलेला शिक्षकास त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना टेस्टमध्ये स्वॅब पॉझिटीव्ह आला होता. या रुग्णाचा शनिवार पहाटे मृत्यू झाला