नांदेड, बातमी24ः- कंधार तालुक्यातील फु लवळ या छोटयाशा गावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवार वाढली आहे. यातील सर्वच्या सर्व रुग्णांना कंधार येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.
रविवारी सकाळच्या सत्रात आलेल्या अहवालात कंधार तालुक्यातील फु लवळ येथील आठ व मानसपुरी येथील एक असे नऊ रुग्ण आढळले. फु लवळ येथील पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पाच लहान लेकरांचा समावेश असून यात चार मुली व एक मुलगा आहे. लहान बालके दहा ते बारा वर्षांच्या आतील आहेत. तर दोन महिला ज्यांचे वय 25 व 50 तसेच 25 व 60 वर्षीय पुरुषाचा आहे. यापूर्वी फु लवळ येथील 65 वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील मयताची पत्नी व मुलगी या दोघीही यापूर्वीच कोरोना पॉझिटीव्ह आल्या असून या गावातील कोरोनाबाधितांची संख्या अकरावर पोहचली आहे.