नांदेड, बातमी24ः- काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमरनाथ राजुरकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याने हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह काही अधिकारी होम क्वॉरंटाईन झाले आहेत. हे सर्व अधिकारी गुुरुवारी स्वॅब देणार असून त्यांच्या स्वॅबकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
आ. राजूरकर हे मधल्या काळात मुंबई येथे गेले होते. मुंबई येथे असतानाच त्यांना सर्दी झाली होती. मुंबई येथेच तपासणी केली होती. परंतु अहवाल निगेटीव्ह आला होता. नांदेड येथे तपासणी केली, असता त्यांचा व त्यांच्या मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची तपासणी करण्यात आली. यात सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
शनिवारच्या बैठकीस राजूरकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहिल्याने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हापरिषद प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, आरोग्य अधिकारी डॉ.पवार, जिल्हापरिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. कोंढेकर, पोलिस अधिकारी पवार आदी होम क्वॉरंटाईन झाले आहेत. या सर्व अधिकार्यांचा स्वॅब गुरुवारी घेतला जाणार आहे.