नांदेड, बातमी24ः- चार-पाच नव्हे तर तब्बल 29 गुन्यातील कुख्यात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास जेरबंद केले. या आरोपीस पुढील तपासासाठी तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरी व दरोडयाच्या प्रकरणातील गुन्हयाचा तपास करत असताना दि. 15 जून रोजी तेलंगणा व नांदेड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद असलेला आरोपी अर्धापुर तालुक्यातील नांदुसा येथील लक्ष्मण पिराजी मेक्कर हा चौफ ाळा भागातील एका लग्न समारंभासाठी आला असल्याची माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. मात्र आरोपी लक्ष्मण मेक्कर याने तेथून गोदावरी नदीच्या काठाने पळ काढला.
पोलिसांनी नवाघाट पुलाच्या रोडने मुजामपेठ भागात पोलिसांनी त्यास अटक केली. या आरोपीवर लिंबगाव व भाग्य नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पंधरा तर तेलंगणा राज्यातील विविध पोलिस ठाण्यात 14 गुन्हे नोंद आहेत. मधल्या काळात तो जामिनावर सुटला होता. तेव्हापासून फ रार होता. स्थानिक गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी तेलंगणा पोलिसांच्य त्यास स्वाधीन केले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडरंग भारती, जशवंतसिंग शाहू, अब्दुल रब, मारोती तेलंग, सखाराम नवघरे, रुपेश दारसवाड, मोतीराम पवार, गणेश धुमाळ यांच्या पथकाने केली.