नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र पश्चिम विभागाचे वायुदल प्रमुख

देश

नांदेड,बातमी24ः- नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले एअर मार्शल विवेक चौधरी हे वायुदलाच्या पश्चिम प्रमुख पदी निवड झाली आहे. एअर मार्शल विवेक चौधरी हे भारतीय वायुदलातील महत्वाच्या पदावर रुजू झाले आहेत. जिल्हावासियांसाठी भूषणाची बाब आहे.

जिल्ह्यातील हदगाव हस्तरा हे गाव आहे. चौधरी कुटुंब हे मुळचे या गावचे आहेत. सत्तर वर्षांपूर्वी एअर मार्शल विवेक चौधरी यांचे वडिल रामराव गणपतराव चौधरी व त्यांचे कुटुंब हैदराबाद येथे स्थलांतरीत झाले. रामराव चौधरी यांचे वय 90 वर्षे इतके,असून गावात मोठी शेती व घर आहे.त्यांचे सुपुत्र विवेध चौधरी यांनी पुणे येथून शिक्षण घेत 1982 साली वायुदलात रुजू झाले.

एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची भारताच्या पश्चिम विभागाचे वायुदल प्रमुख म्हणून निवड झालेली असून दि. एक ऑगस्टला ते आपल्या अधिकाराची सूत्रे स्विकारणार आहेत.अशी माहिती एअर मार्शल विवेक चौधरी यांचे नातेवाइक लक्ष्मीकांत गुंटुरकर यांनी दिली.
—–
विवेक चौधरी हे डिसेंबर 1982 मध्ये फायटर पायलट म्हणून वायुसेनेत दाखल झाले.मिग-21,मिग-29, सुखोई-30 अशा वायुदलाच्या विमानातील गगनभरारीचा त्यांना अनुभव आहे.ते एक अनुभवी पायलट असून 3800 तासांपेक्षा जास्त विमान उडविण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.1999 च्या कारगिल मोहिमेत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.