नांदेड पंचायत समिती गट विकास अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड

 

नांदेड,बातमी24: नांदेड पंचायत समिती गटविकास अधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी अँटीजन किटद्वारे चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नांदेड पंचायत समिती गटविकास अधिकारी राजू तोटावार यांच्याकडे नांदेड पंचायत समितीचा प्रभारी कारभार आहे. शनिवारी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अंग दुःखी व साधारण सर्दी जाणवत असल्याने चाचणी करून घेतली. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मला कसल्याही प्रकारचा त्रास सध्यातरी नाही.पुढील उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणार असल्याचे तोटावार यांनी सांगितले.नांदेड जिह्यात मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.