नांदेड, बातमी24; नांदेड जिल्हयात कोरोनाचा आकडा कधी वाढेल आणि कधी घटेल याचा नेम नाही. मंगळवारी कोरेानाच्या रुग्णांची संख्या 134 होती, तर दहा जणांना एकाच दिवशी बळी गेला होता. त्यामुळे चिंतेत असलेले वातावरण बुधवारी आलेल्या आकडेवारीमुळे काहीअंशी निवळले आहे. बुधवारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा निम्यापेक्षा खाली आला आहे.
बुधवार दि. 29 जुलै रोजी 242 अहवाल तपासण्यात आले. यामध्ये 179 अहवाल निगेटीव्ह आले, तर 42 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 568 एवढी झाली. तर दहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 790 झाली. आजघडिला 693 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 15 रुग्ण हे गंभीर आहेत. यात सात महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे.
——
चार जणांचा मृत्यू
मागच्या चौविस तासात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्यो सराफ ा गल्ली येथील सत्तर वर्षीय पुरुषाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर येथे, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 25 वर्षीय महिलेचा, किनवट तालुक्यातील कलारी येथील 54 पुरुष, तर नांदेड येथील दीप नगर भागात राहणार्या 68 वर्षीय पुरुष या तिघांचा विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.त्यामुळे जिल्हयातील मृतांची संख्या 74 झाली.