उशिरा का होईना पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून त्या मुलीचे कौतुक; बातमी24.कॉम परिणाम

राजकारण

नांदेड, बातमी 24ः नांदेड येथील शारदा भुवन शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फु ले विद्यालयाची विद्यार्थी स्नेहल मारोती कांबळे हिने पाचशे पैकी पाचशे गुण मिळविल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तिचे कौतुक करणारे व्टिट केले. या संदर्भात मंत्री चव्हाण यांच्या संस्थेतील विद्यार्थींनीचे तीन मंत्र्यांकडून दखल हे वृत्त शुक्रवारी प्रकाशित केले होते. बातमी24.कॉम च्या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री अशोक चव्हाण शुभेच्छा देणारे व्टिट केले.

सावित्रीबाई फु ले विद्यालयाची विद्यार्थ्यांनी असलेल्या स्नेहलने दहावी बोर्डाच्या परीक्षेत पाचशे पैकी पाचशे गुण मिळविले. या यशाबद्दल सोशल मिडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या संदर्भात बातमी24.कॉम ने वृत्त कालच प्रकाशित केले होते. राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा कौतुक व अभिनंदन करणारे व्टिट केले होते.