सामाजिक न्याय विभागाकडून त्या गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार

नांदेड

नांदेड, बातमी24ः- दहावीच्या परीक्षेत पाचशे पैकी पाचशे गुण मिळविणार्‍या स्नेहल मारोती कांबळे हिच्या यशाचे कौतुक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने घरी जाऊन करण्यात आले. या वेळी स्नेहल तिचा शाल,श्रीफ ळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाच्या वतीने समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

दहावी बोर्डाच्या परीक्षेत स्नेहल कांबळे हिने पैकीच्या पैकी गुण घेतल्याबदल राज्यभरातून कौतुक होत आहे. या संदर्भाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुुंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्टिट करून शुभेच्छा दिल्या.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष विभागाचे मुख्य सचिव पराग जैन, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, व्हीजेएनटी विभागाच्या उपसंचालिका जयश्री सोनकवडे व लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड यांच्या वतीने समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी स्नेहल कांबळे हिचा घरी जाऊन सत्कार केला. पुढे चालक संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचा मानस स्नेहल हिने व्यक्त केला पुढील शिक्षणासाठी विभागाच्या वतीने सर्वोपतरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही माळवदकर यांनी दिली.