आज रोजी प्राप्त झालेले सर्वच्या सर्व अहवाल निगेटीव्ह

नांदेड

नांदेड, बातमी24ः– सकाळी 28 नमून्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून देण्यात आला आहे. यामध्ये सर्वच्या सर्व अहवाल हे कोरोना निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 296 इतकीच आहे.

जिल्ह्यात गुरुवार दि. 18 जून रोजी कोरोनाचे दहा रुग्ण आढळले होते. याच आठवडयात रविवारी कोरोनाचा एक ही रुग्ण आढळून आला नव्हता. तर सोमवारी नांदेड शहरात एकच रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर मुखेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या सतत वाढत आहे.

शुक्रवारी 28 नमून्यांचा अहवाल आला आहे. यात सर्व नमूने निगेटीव्ह आले आहे. अजून नमूने तपासण्याचे काम सुरु असून सायंकाळपर्यंत उर्वरीत नमून्यांचा अहवाल येेण बाकी आहे. त्यामुळे सायंकाळच्या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.