तीन जणांचा मृत्यू ; रुग्ण संख्येत चढ-उतार कायम

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः- कोरोनाची रुग्ण संख्या कधी वाढेल व कधी कमी होईल हे चाचणी कमी-अधिक करण्यांवर अवलंबून आहे. मंगळवारी 729 चाचण्या घेण्यात आल्या. यात 573 अहवाल निगेटीव्ह आले तर 137 स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 हजार 496 इतकी झाली आहे. तर मागच्या चौविस तासांमध्ये तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूची आकडा 97 इतका झाला आहे.

मंगळवार दि. 4 ऑगस्ट रोजी कोरोनावर उपचार घेत असलेल्या 37 जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 57 झाली. तर सिडको येथील 56 वर्षीय पुरुषाचा दि. 3 रोजी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. इस्लामपुर येथील 45 वर्षीय पुरुषाचा दि. 4 रोजी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय तसेच विद्युत नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा शहरातील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला तिन्ही मयत नांदेड शहरातील आहेत.
——-
तालुकानिहाय आकडेवारी
आरटी-पीसीआ चाचणीद्वारे तपासणीचे अहवाल
लोहा- 3, भोकर-3, देगलूर-11, हदगाव-12, कंधार-1, नांदेड ग्रामीण-1, किनवट-1, मुखेड-9, नायगाव-8, उमरी-3, नांदेड शहर-18, उजैन-मध्यप्रदेश-1, हिंगोली-1 असे 72 रुग्ण आहेत.
——-
अंटीजन चाचणीचे अहवाल
हिमायतनगर-18, लोहा-5, देगलूर-21, बिलोली-6,मुखेड-1 तर नांदेड शहरातील 14 रुग्णांचा समावेश आहे.