त्या वादावर माझ्या बाजूने पडदा टाकतो- आमदार राजेश पवार

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः- नायगाव तालुक्यातील नावंदी येथील मोहनलाल ठाकुर यांच्याशी भाजपचे आमदार राजेश पवार यांनी भ्रमध्वनीवरील चर्चेदरम्यान अर्वांच्च भाषेचा वापर केला. या प्रकाराची जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणी राजेश पवार यांनी खुलासा करत या प्रकरणी माझ्या तोंडून त्याला समजावण्याच्या भरात अनवधानाने चुकीचे बोलले गेले. त्यामुळे या वादावर माझ्याबाजुने पडदा टाकतो, असे राजेश पवार यांनी जाहीर केले.

ते म्हणलो, की एक लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासकीय बैठका आणि लोकोपयोगी अभियान,या व्यतिरिक्त इतर जाहीर समारंभांना जाणे मी सध्या जाणीवपूर्वक टाळत आहे, लोकप्रतिनिधी गावात गेल्याने लोक जमा होतात आणि गर्दी होवून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो. यामुळेच मी गावांच्या भेटी कोरोनाच्या प्रसार काळात स्थगित केल्या होत्या , मात्र लोकांशी फोन द्वारे संपर्क साधत त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याकरिता मी आणि माझे कार्यालय सतत कार्यरत आहे.

अश्या पार्श्वभूमीवर मला परवा एका नागरिकाने मला फोन केला, मी त्याना वारंवार काय अडचण आहे असे विचारुनही ते मला गावात या अशी मागणी करू लागले आणि आता आला नाहीत तर यापुढे ही पुंन्हा गावात येवू नका असे बोलले, त्याच्या या बोलण्यावर ते असे जनुनबुजुन करित असल्याचा माला संशय आला आणि संतापून माझ्या तोंडून त्याला समजावण्याच्या भरात अनवधानाने चुकीचे बोलले गेले.

लोकप्रतिनिधी असले तरी देखील तो माणूस च असतो आणि कधी तरी भावनेच्या भरात चुकीचा शब्द निघून जातो . मात्र मतदारसंघाचा आमदार म्हणजेच पालक या नात्याने मतदारसंघातील सर्व नागरिक हे मला माझ्या कुटुंबांसारखेच आहेत, याची मी आपणा सर्वांना खात्री देतो आणि या वादावर माझ्याबाजुने पडदा टाकतो.
——
चौकट
माझ्या विरोधकांनी आणि अवैध धंदे करणार्‍यानी असे किती हि षड्यंत्र माझ्या विरुध्द या पुढे ही रचले तरि सुद्धा मी संयमाने मतदारसंघातील लोकोपयोगी विकास कामे आणि मतदारसंघातल्या सोयीसुविधा याबाबत प्रशासनासोबत चालू असलेला पाठपुरवठा चालुच राहणार आणि गोरगरीब, शेतकरी यांच्यावर अन्याय करणार्‍या विरुद्ध आणि मतदार संघातिल अवैध धंद्या विरुद्ध माझा लढा या पुढेही चालूच राहणार असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.