नांदेड, बातमी24ः भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार चिखलीकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केलेली टीका स्वतःच्या अंगलट आल्याची चर्चा होत आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे दि. 22 मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आले होते. चव्हाण यांचा अहवाल नांदेडमध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर ते मुंबई येथे उपचारासाठी दाखल झाले होते. यावरून खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये का उपचारास का थांबले, त्यांना नांदेडच्या डॉक्टरांवर विश्वास नाही काय? अशी टीका खासदार चिखलीकर यांनी केली. त्या वेळी चिखलीकर यांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसमधून झाला होता.
दोन दिवसांपूर्वी प्रताप पाटील चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यापूर्वी त्यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु असताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यांच्यावर औरंगाबादमधील एमजीएम महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर उपचारावरून टीका करणारे प्रताप पाटील चिखलीकर हे बाहेर जाऊन कसे काय उपचार घेत आहेत. असा सवाल करत आहेत. त्यामुळे चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केलेली टीका खासदार चिखलीकर यांच्याच अंगलट आल्याचे बोलले जात आहे.
जेवणाच ताट किचन मधे दिलं तर बाथरूम मद्ये जाऊन जेवण करता का ??
????
चिखलीकर साहेबांनी संभाजीनगर येथील हाॅस्पिटल मध्ये टेस्ट केली आणि तिथेच ॲडमिट झाले, मुंबईला नाही पळाले?