वनविभागाच्या दोन्ही प्रमुख अधिकार्‍यांच्या नांदेड येथून बदल्या

नांदेड

नांदेड, बातमी24ःनांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसरंक्षक एस.व्ही. मंकावार या दोन्ही अधिकार्‍यांच्या बदल्या नांदेड येथून झाल्या आहेत.

विविध विभागांच्या बदल्यांच्या आज शेवटचा दिवस असल्याने शासनाने आदेश निर्गमित होत आहेत. भारतीय वनसेवेतील अधिकार्‍यांच्या पदोन्नती व बदलीव्दारे बदल्यांची यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यभरातील अधिकार्‍यांच्या बदल्या व पदोन्नत्यांचे आदेश काढण्यात आले. यामध्ये नांदेड विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांची आलिबाग येथे तर एस.व्ही. मंकावार यांची उपवनसंरक्षक म्हणून औरंबाद येथे बदली झाली आहे
आशिष ठाकरे यांच्या जागी पुणे येथील प्रसिद्धी विभागाताील विभागीय वन अधिकारी आर.ए. सातेलीकर हे उपवनसंरक्षक म्हणून येणार आहेत.