नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून भराभरा वाढत जाणार्या कोरोनाच्या रुग्णसंख्येला सोमवारी बर्यापैकी बे्रक लागल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. 59 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. विशेषतः147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू 110 रुग्ण गंभीर आहेत.
सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी शासकीय रुग्णालय व विविध कोविड केअर सेंटर येथे उपचार घेणार्या 147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 779 इतकी झाली आहे. त्याचशिवाय 369 नमूने तपासण्यात आले आहेत. यातील 274 नमूने निगेटीव्ह तर 59 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. आरटी-पीसीआर तपासणीत 48 व अंटीजन चाचणीमध्ये11जण पॉझिटीव्ह आले.त्यामुळे जिल्हयातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 3 हजार 356 एवढी झाली आहे. सध्या 1 हजार 440 जण उपचार घेत आहेत.
यामध्ये नांदेड मनपा क्षेत्र- 12, लोहा-2, उमरी-1,भोकर-2, कंधार-1, नायगाव-4, हिंगोली-1, नांदेड ग्रामीण-4, देगलूर-1, हिमायतनगर-1, हदगाव-8, किनवट-8, मुखेड-2, परभणी-1 तर अंटीजण चाचणीत नांदेड मनपा क्षेत्र-2, मुखेड-1, बिलोली-2, किनवट-5, मुदखेड-1 नवे रुग्ण आहेत.
——-