जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः राज्यात बदल्यांचा हंगामाने जोर धरलेला असताना जिल्हा परिषदेतील एका अधिकार्याची बदली करण्यात यावी, यासंबंधीचे पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तर भाजपचे नांदेड नांदेड खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्या अधिकार्याची बदली करू नये, यासंबंधीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. कोणाच्या पत्राचा जोर भारी पडणार हे काही दिवसात कळणार आहे.
कोरोनाच्या काळात सामाजिक सेवेच्या माध्यमातून अन्नछत्रालय, कोरोना किट व भाजीपाला वाटपात स्तुत्य काम करून सामाजिक व राजकीय पातळीवर गवगवा मिळविणारे ते अधिकारी आहेत. मधल्या काळात त्यांना मानसिक रुग्ण म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्या विभागाच्या सभापतीसोबत विळया-भोपळयाचे सुरु आहे. दरम्यानच्या काळात असभ्य भाषेचा वापर व बंदुकधारी अंगरक्षक सोबत बाळगल्याची तक्रार त्या खात्याच्या सभापतींनी केली होती. या तक्रारीचा संदर्भ जोडत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकार्याची नांदेड येथून बदली करण्यात यावी, यासंबंधीचे पत्र मागच्या महिन्यात आले.
या पत्रानंतर मंत्रालयस्तरावर कमी-अधिक प्रमाणात हलचाली सुरु झाल्या आहेत. नवा अधिकारी शोध ही सुुर झाला आहे. असे असताना त्या अधिकार्याच्या बाजूने भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पत्र दिले, असून या अधिकार्याची बदली करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांचे एका अधिकार्यासंदर्भात विरोध व समर्थन करणारे पत्र गेल्यामुळे राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांपैकी एकाच्या पत्राचा विचार होणार असला, तरी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या पत्रावर मंत्रालयस्तरावर हलचाली सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.