त्या आमदारांनी ताकद लावून ही प्रभारी कार्यकारी अभियंता जाग्यावरच

राजकारण

नांदेड, बातमी24ः लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार शामसुुंदर शिंदे यांनी नांदेड जिल्हापरिषद पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांच्याकडील पदभार काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने आमदारांच्या पत्राची तसेच मंत्र्यांच्या पत्रांच्या सूचना बेदखल केली. त्यामुळे त्या आमदारांनी कितीही ताकद लावली, तरी प्रभारी अभियंता जाग्यावरच असल्याचे बघायला मिळत आहे.

देगलूर पंचायत समिती येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उपअभियंता असलेल्या बारगळ यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा पदभार देण्यात आला. मात्र बारगळ यांच्यावर सुरुवातीपासून जिल्हयातील आमदारांची नाराजी आहे. तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कारभार करतात.अशी तक्रार प्रामुख्याने भाजपचे आमदार राजेश पवार, शामसुंदर शिंदे, माधवराव पाटील जवळगावकर आदींची आहे.

लोहा तालुक्यातील माळेगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून आमदार शामसुंदर शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र बारगळ यांनी परस्पर जाऊन तेथील योजना सुरु केली होती. त्या योजनेच्या कामावरून मंत्रालयस्तरावरही बारगळ यांच्याविरोधात तक्रारी झाल्या आहेत. बारगळ यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मंत्रालयस्तरावर केली गेली. मधल्या काळात जलसंधारणमंत्री गुलाब पाटील यांनी शिंदे यांच्या पत्रावर बारगळ यांच्यावर योग्यती कारवाई करण्याचे आदेश जिल्हापरिषदेला दिले होते. मात्र त्या पत्राच्या अनुषंगाने प्रशासनाने कारवाई केली नाही. मंत्र्यांचा आदेश बारगळ यांच्यासंबंधी दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे बघायला मिळाले. जिल्ह्यातील आमदारांची विशेषःता राजेश पवार व शामसुंदर शिंदे या दोन आमदारांनी बारगळ यांना हटविण्यासाठी बरीच ताकद लावली. मात्र बारगळ जाग्यावर आहेत.