नांदेड, बातमी24ः एफआरपीची थकित रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी स्वातंत्रदिनी सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार होते. या मात्र मागण्यांबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत सदरचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिली.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे शेतकर्यांची एफ आरपीची थकित रक्कम मोठया प्रमाणात आहे.ही रक्कम देण्यात यावी, यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघातील सरपंचाच्या वतीने पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यासंबंधी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात झालेल्या अधिकार्यांसमवेतील बैठक चर्चा झाली. त्यानंतर अशोक चव्हाण यांना आंदोलकांना ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचे प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.